वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अर्थात अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांना कोरोना व्हायरसवरील प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. ७८ वर्षीय बायडन यांना तूर्तास कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. याचं थेट प्रक्षेपणही करण्यात आलं. जो बायडन हे कोरोनाच्या हाय रिस्क प्रवर्गात मोडतात.
जो बायडन यांना फायझरकडून तयार करण्यात आलेल्या कोरोना लसीचा पहिला डोस, देण्यात आला आहे. अमेरिकेत फायझरच्या लसीला परवानगी मिळाल्यानंतर संपूर्ण जगासमोर हे वृत्त आलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जाहीरपणे कोरोना लस घेतली आहे. जेव्हा कोरोना लस उपलब्ध होईल तेव्हा लोकांच्या मनात भीती नसावी आणि ते लस घेण्यासाठी तयार असावेत यासाठीच आपण जाहीरपणे लस घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे. जोय बायडन यांनी ख्रिश्चियाना केअर हॉस्पिटलमध्ये ची लस घेतली. “जेव्हा लस उपलब्ध असेल तेव्हा लोक तयार असेल पाहिजेत यासाठीच मी हे प्रात्यक्षिक केलं आहे. याबद्दल चिंता करण्याची काही गरज नाही,” असं जो बायडन यांनी म्हटलं आहे. ख्रिश्चियाना केअर हॉस्पिटलच्या आरोग्य सेवा प्रमुखांनी बायडन यांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला. दरम्यान यावेळी कोरोनाची लस घेणारे डॉक्टर जो बायडनदेखील उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच बायडन यांनी कोरोना लसीवर विश्वास ठेवा असं, देशातील नागरिकांना सांगितलं होतं. प्रथन श्रेणीतील वैज्ञानिकांनी अथक प्रयत्नांतून विकसित केलेल्या या लसीवर विश्वास ठेवा असं म्हणत या लसीच्या मूल्यांकनासाठी राजकीय प्रभावाचा वापर करण्यात आला नसल्याची बाबही स्पष्ट केली होती. अमेरिकेत एफडीएनं काही दिवसांपूर्वीच फायझरच्या लसीला देशात आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली. वैज्ञानिकांवर असणारा विश्वासच आपल्याला इथवर घेऊन आला आहे. सध्या आपल्यासमोर अनेक अडचणी आहेत. पण, येत्या काळात परिस्थिती नक्कीच सुधारेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती.