नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबर २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने घेतला आहे. तसेच कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार पाहता आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान सेवांच्या उड्डाणांवर पुन्हा बंदी घातली आहे. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ही बंदी असणार असून डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने त्याबाबतचे आदेश आज जारी केले आहेत. डीजीसीएच्या या आदेशनानंतर भारतातून परदेशात जाणाऱ्या आणि परदेशातून भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानसेवांचं उड्डाण होणार नाही. मात्र, डीजीसीएचा हा आदेश इंटरनॅशनल ऑल कार्गो ऑपरेशनला लागू राहणार नाही. तसेच ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत येणाऱ्या विमान सेवाही सुरू राहणार आहेत. या आदेशानुसार काही निवडक मार्गांवरील आंतरराष्ट्रीय शेड्यूल फ्लाइट्सच्या उड्डाणांनाही मंजुरी देण्यात आली आहे. कोरोना काळात ज्या सेक्टरचं सर्वाधिक नुकसान झालं. त्यात एव्हिएशनचाही समावेश आहे. दीर्घकाळ विमानसेवा बंद राहिल्याने या सेक्टरचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं. त्यामुळे सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू करून ७० टक्के क्षमतेने देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यास परवानगी दिली होती. देशात २५ मार्च रोजी लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्याआधी २३ मार्च पासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करण्यात आली होती. ही बंदी २९ मार्चपर्यंत होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढल्याने लॉकडाऊनचा कालावधीही सहा महिन्यावर गेला. त्यामुळे विमानांच्या उड्डाणालाही बंदी घालण्यात आली होती.