TheClearNews.Com
Friday, April 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लसीचा डोस घेतल्यानंतरही अनिल वीज यांना कोरोनाची लागण : भारत बायोटेकनं दिलं स्पष्टीकरण

The Clear News Desk by The Clear News Desk
December 5, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाची लस घेणाऱ्या भाजप मंत्र्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. हैदराबादस्थित भारत बायोटेकने विकसित केलेली ‘कोवॅक्सिन’ ही लस चाचणीदरम्यान घेतल्यानंतर हरयाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे या लसीबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली असताना याबाबत भारत बायोटेकने स्पष्टीकरण दिलं आहे.

भारत बायोटेकनं निवेदनात म्हटलं, “आमची क्लिनिकल ट्रायल ही दोन डोसवर आधारित आहे. त्यासाठी २८ दिवस द्यावे लागतात. म्हणजेच कोवॅक्सिन लसीची कार्यक्षमता ही दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनंतर निश्चित केली जाऊ शकते.” हरयाणाचे मंत्री अनिल विज यांनी क्लिनिकल ट्रायलदरम्यान दोन आठवड्यांपूर्वी कोवॅक्सिन लसीचा एक डोस घेतला होता. त्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यानंतर भारत बायोटेकने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. कंपनीने पुढे म्हटलं की, “चाचणीचा भाग म्हणून ५० टक्के सहभागींना ही लस मिळाली तर इतरांना प्लेसबो देण्यात आला होता. फेज-३ मधील ट्रायल ही दुप्पट करण्यात आली होती. यामध्ये ५० टक्के सहभागींना लस देण्यात आली तर उर्वरितांना प्लेसबो देण्यात आला.” अनिल विज यांनी स्वेच्छेने भारत बायोटेकच्या मानवी चाचणीत भाग घेतला होता. यामध्ये २५,००० पेक्षा अधिक लोकांना चाचणी डोसेस देण्यात आले होते. २० नोव्हेंबर रोजी विज यांना हा डोस देण्यात आला होता. ते हरयाणातील करोनाच्या लसीचा डोस घेणारे पहिले व्यक्ती ठरले होते. त्याचबरोबर हरयाणातील ४०० लोकांनाही कोवॅक्सिनचा डोस देण्यात आला यामध्ये रोहतकचे पीजीआयएमएस विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ओ पी कार्ला यांचाही समावेश आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

अनिल वीज यांनी अंबालाच्या एका रुग्णालयात २० नोव्हेंबर रोजी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता. कोव्हॅक्सिन लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रोटोकॉलनुसार, ०.५ मिलीग्रॅम डोस दिला जातो. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस २८ व्या दिवशी दिला जातो. म्हणजेच अनिल वीज यांना दुसरा डोस अद्याप दिला गेलेला नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

धक्कादायक : महिन्याला फिनाईलसाठी लाखोचे बिल, तरी विद्यापीठातील स्वच्छतागृहांची दुर्दशा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३८,०७९ कोरोनाबाधित, ५६० रुग्णांचा मृत्यू

July 17, 2021

धरणगाव नगरपरिषदेतर्फे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन

January 26, 2021

जालना पोलिसांचा मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज ; कार्यकर्त्यांकडून धुळे-सोलापूर महामार्गावर जाळपोळ !

September 1, 2023

भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या स्पर्धकांची राज्यस्तरीय पातळीवर निवड

January 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group