जळगाव (प्रतिनिधी) मविप्र संस्थेच्या नूतन मराठा ज्युनिअर कॉलेजमध्ये बनावट मस्टरवर काही शिक्षकांच्या सह्या घेत २०१७ पासून आजपावेतोची हजेरी दाखवून शासनाची कोट्यवधींच्या फसवणूकीचा कट रचल्याप्रकरणी अॅड.विजय भास्कर पाटील यांच्या फिर्यादीवरून निलेश भोईटे, प्राचार्य एल.पी.देशमुखांसह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मविप्र संस्थेचे नूतन मराठा ज्युनिअर कॉलेजमध्ये बनावट मस्टरवर काही शिक्षकांच्या सह्या घेत २०१७ पासून आजपावेतोची हजेरी दाखविण्याचा कट स्व.नरेंद्र अण्णा पाटील गटाकडून १९ जुलै रोजी उधळण्यात आला होता. अॅड.विजय भास्कर पाटील यांना या बाबत माहिती मिळताच त्यांनी कॉलेजमध्ये धडक दिली. अॅड. पाटील यांना बघताच घटनास्थाळावरून सर्वांनी पळ काढला. परंतू सह्या केलेले मस्टर मात्र, अॅड. पाटील यांना ताब्यात सापडले होते. याबाबत अॅड. पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवार रोजी सायंकाळी मी संस्थेच्या कार्यालयात बसलेलो असताना मला कळाले की, महाविदयालयाचे उपप्राचार्य ( ज्युनिअर कलेज) ए.बी. वाघ हे महाविदयालयात असलेल्या कॅबीनमध्ये कार्यालयीन वेळ संपल्यानंतर पाच महीला व दोन पुरुष असे एकून सात लोक अनोळखी व संदिग्ध तसेच उपप्राचार्य ए बी वाघ, प्रकाश आनंदा पाटील (शिक्षक अमळगाव विदयालय ता. अमळनेर), शिवराज बा माणके ही सर्व मंडळी उपप्राचार्याची कॅबिन बंद करून खोटे व बनावट मस्टर तयार करित आहेत, असे समजले. त्या वेळी मी उपप्राचार्य ए बी वाघ यांना त्यांच्या मोबाईल नंबरवर फोन लावला. परंतु दोन वेळा फोन लावून देखील त्यांनी माझा फोन घेतला नाही. त्यानंतर स्व:ता व माझ्या सोबत असलेले तिन व्यक्ती नामे सुहास वसंत चौधरी, पियुष नरेंद्र पाटील, यश सुहास चौधरी असे कॉलेजमधील उपप्राचार्य यांच्या कॅबिनकडे गेलो. त्या ठिकाणी वर नमूद केलेले सात अनोळखी व्यक्ती व चार संस्थेचे कर्मचारी असे सर्व लोक हजर होते.
तसेच तेथे जुने व मागील चार पाच वर्षाचे कॅलेंडर (दिनदर्शिका) घेवून एक खोटे व बनावट मस्टर तयार करून त्यावर जून ते जुलै अशा कालावधीत मागील चार वर्षाच्या खोटया सह्या त्या मस्टरवर करित होते. त्याच वेळी आम्ही दरवाज्याचे बाहेर थांबून असतांना त्याचेमध्ये चर्चा चालू होती की, निलेश भोईटे व प्राचार्य एल.पी. देशमुख यांच्या सांगण्याप्रमाणे तूमचे चार वर्षाव मस्टर तुमच्या सह्यांचे तयार करून देत आहोत. शासनाकडून मान्यता घेवून पगार काढून देणे हा व्यवहार वेगळा राहीण, असा प्राचार्य देशमुख यांचा फोन मला आत्ताच आला होता, असे उपप्राचार्य ए.बी. वाघ, प्रकाश आनंदा पाटील व शिवराज माणके तेथे उपस्थित अनोळखी महीला व पुरुषांना सांगत असतांना त्यांना आमची चाहूल लागली. त्यानंतर त्यांनी बोलणे थांबविले. त्यावेळी आम्ही दरवाजा ढकलून आत गेलो असता त्यांची आम्हास पाहून भांबेरी उडाली.
त्यावेळी मी अनोळखी सात व्यक्तीपैकी एक जण सहया करित असलले मस्टर पाहीले असता मी त्यांना सांगितले की, तुम्ही चार वर्षाचे बनावट मस्टर तयार करुन या सात व्यक्ती संस्थेच्या कर्मचारी नसताना तुम्ही त्यांच्या चार वर्षाच्या सहया एकाच दिवशी करून संस्थेची व शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणुक करीत आहात, असे सांगताच तेथे हजर असलेले सात अनोळखी इसम व वर उल्लेख केलेले चार कर्मचारी कॅबिनमधून निघून पळू जावू लागले. ते पळून जात असतानाचे आम्ही मोबाईलमध्ये त्यांचे फोटो घेतले. तसेच ते बनावट बनवत असलेले मस्टर मी फिर्याद देण्यासाठी तेथून ताब्यात घेतले. सदर मस्टरवर एक ते सात क्रमांक लिहलेले असून पाचव्या क्रमांवर सौ ए.एस भोळे तर श्रीमती एम.ए. धामणे व एन.एस. गावडे यांचे सहा सात क्रमांकावर नावे लिहलेली आहे. त्यापैकी क्रमांक सहाच्या दिनांक जून पासून ते जुलै पर्यत सहया केलेल्या आहेत व क्रमांक यांच्या दिनांक जून पासून आक्टोबर पावेतो सहया केलेल्या आहे. आम्ही अचानक आत गेल्यामूळ श्री.गावडे यांची दिनांक आक्टोबरची सही अर्धवट राहून बाकी पुढील सहया करावयाच्या राहून गेल्या आहेत.
निलेश रणजित भोईटे व त्याचे कथीत संचालक मंडळ लक्ष्मण प्रताप देशमुख प्राचार्य यांचे सांगणे वरून ए. बी वाघ, शिवराज बा माणके, प्रकाश आनंदा पाटील कर्मचारी नसलेले बनावट सहया करणारे क्रमांक ३) एम.ए. ग्रामणे, एन.एस.गावडे व तशाच बनावट सहया करण्याचे उद्देशाने तेथे हजर असलेले क्रमांक सौ ए.एस भोळे व इतर चार अनोळखी व्यक्ती अशांनी एकत्रित येवून वरील फिर्यादीत नमुद सर्व आरोपींनी कट करून संस्थेची व शासनाचे कोणतेही कर्मचारी नसतांना सात जणांच्या एकाच वेळी चार वर्षाच्या सह्या करून गेल्या चार वर्षांपासून काम करीत असल्याचे भासवून शासनाची व संस्थेची कोट्यावधी रुपयांची फसवणूक स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी वरील फिर्यादीतील नमूद सर्व आरोपींनी कट रचला होता. हे सर्व व्यक्तीविरुद्ध खोटे कागदपत्र तयार करून सर्व आरोपी यांनी कट करून सर्व संस्थेची व शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करण्याचा गुन्हा तसेच वर नमूद आरोपी क्रमांक दोन तीन चार व पाच हे संस्थेच्या व शासनाचा पगार घेऊन शासनाची फसवणूक करणार होते. अशी तक्रार ॲड विजय भास्कर पाटील यांनी शनिवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दिली असून या तक्रारीवरून नीलेश रणजित भोईटे रा भोईटेनगर, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण देशमुख रा.महाबळ कॉलनी, उपप्राचार्य ए बी वाघ रा.शिवकॉलनी, शिवराज मानके, प्रकाश आनंदा पाटील, एम.ए धामणे, एन.एस.गावडे, ए.एस.भोळे याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात भादवि कलम १२० ब, ४६५,४६७,४६८,४२०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.