जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात २० नोव्हेंबर, २०२० पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) लागू करण्यात आले आहे.
या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास स्थानिक पोलीस स्टेशन कार्यालयाच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश ज्यांना लाठी किंवा तत्सम वस्तु घेतल्याशिवाय चालता येत नाही अशा वृद्ध अथवा अपंग इसमांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.