नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एका तरूण शेजारी राहणाऱ्या महिलेच्या प्रेमात पडला. तीन मुलांची आई असलेली महिला तरूणाच्या अशी काही प्रेमात पडली की, दोघे कधीही एकमेकांना भेटू लागले होते. महिलेने तरूणाला गावातीलच एका ठिकाणी अर्ध्या रात्रीनंतर भेटण्यास बोलवलं होतं. मात्र पतीने जेव्हा आपल्या पत्नीला पाहिल तर त्याला धक्का बसला. संतापलेल्या पतीने पत्नीच्या प्रियकरावर हल्ला केला. यानंतर महिलेने पतीसोबत मिळून आपल्याच प्रियकराची हत्या केली. ही घटना बिहारच्या मधुबनी मधील आहे.
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या या धक्कादायक घटनेचा खुलासा स्थानिक पोलिसांनी केला. अनिल कुमार महतो याची हत्या गावाजवळ झाल्याने एकच खळबळ उडाली होती. कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. घटनेच्या केवळ ४ दिवसातच पोलिसांनी हत्येचं रहस्य उलगडलं. पोलिसांनी सांगितलं की, मृत अनिलचं विवाहित शेजारी महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. मृतकाची प्रेयसी ३ मुलांची आई आहे. पोलीस म्हणाले की, चौकशी दरम्यान तरूणाची विवाहित प्रेयसी आणि पतीने आपला गुन्हा कबूल केला.
गळा आवळून हत्या
पोलिसांनी सांगितलं की, महिलेने अर्ध्या रात्रीनंतर प्रियकराला भेटायला बोलवलं होतं. अनिल ठरलेल्या जागी पोहोचला. काही वेळाने महिलाही तिथे पोहोचली. दोघेही रात्रीच्या अंधारात रोमान्स करू लागले होते. दुसरीकडे महिलेच्या पतीला तिच्यावर संशय आला होता. असं सांगितलं जात आहे की, पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराचं बोलणं ऐकलं होतं. अशात तोही तिचा पाठलाग करत तिथे पोहोचला. पतीला समोर बघून ती गोंधळली. संतापलेल्या पतीने अनिलवर हल्ला केला. यानंतर महिलेनेही पतीसोबत मिळून अनिलची गळा आवळून हत्या केली. पती-पत्नीने तरुणाची हत्या केल्यावर त्याचा मृतदेह घटनास्थळापासून दूर नेऊन फेकला होता.
पोलिसांनी सांगितलं की, तरूण आणि विवाहित महिलेत गेल्या ५ वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू होतं. दोघेही पळून जाऊन लग्न करण्याच्या विचारात होते. याआधीही ते एकमेकांना भेटत होते. पोलिसांनी आता पती पत्नीला अटक केली आहे. पुढील कारवाई केली जात आहे.
















