TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : डांभुर्णीच्या ‘सिरीयल किलर’ला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा !

भोकरच्या अल्पवयीन बालकाचा खून आणि अत्याचार प्रकरणी न्यायालयाचा निकाल !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 9, 2022
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भोकर येथील अल्पवयीन बालकाचे अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करून खून केल्याप्रकरणी यश उर्फ गोलु चंद्रकांत पाटील या आरोपीला मरेपर्यंत दंडासह जन्मठेपेची शिक्षा आज न्यायालयाने सुनावली आहे. दरम्यान, आरोपी ‘सिरीयल किलर’ होता, त्याने यापूर्वी अशाच पद्धतीने एका बालकाचा खून केल्याचे समोर आले होते.

यासंदर्भात अधिक असे की, डांभुर्णी गावातील मुलीचे लग्न भोकर गावातील मुलाशी दि.12 मार्च 2020 रोजी गावात लागणार होते. त्यादिवशी मुलीकडून आलेल्या पाहुण्यात आरोपी यश उर्फ गोलु चंद्रकांत पाटील हा सुद्धा भोकर गावी आलेला होता. तेव्हा त्याची गावातील अकरा वर्षीय अल्पवयीन मुलाशी ओळख झाली. त्यानंतर यश त्याला गावातील शेतात संडासला जायचे म्हणून घेऊन गेला आणि त्याठिकाणी त्या अल्पवयीन बालकासोबत अनैसर्गिक संभोग केला. एवढेच नव्हे तर त्या मुलाला मारून देखील टाकले. अल्पवयीन मुलगा घरी आला नाही म्हणून त्याच्या वडिलांनी तालुका पोलीस स्टेशनला मुलाच्या अपहरणाची फिर्याद दाखल केली. पोलिसांकडून तपास सुरु असतांना मुलाचे प्रेत दि.16 मार्च 2020 रोजी मिळून आले. त्यानंतर अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून खून केला असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्याच दिवशी आरोपी यश उर्फ गोलु चंद्रकांत पाटील याला अटक करण्यात आली होती. तपासी अंमलदार पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी गुन्ह्याचा तपास करून दि.10 जून /2020 रोजी सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

एकूण 12 साक्षीदार तपासले
आरोपी विरुद्ध गुन्हा सिध्द होण्यासाठी जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे यांच्याकडे एकूण 12 साक्षीदार तपासले. यात प्रामुख्याने गावातील त्या दिवशी बर्फाचा गोळा विकणारा अनिल भोई, डॉ. निलेश देवराज,लक्ष्मण सातपुते, ना.तहसीलदार व इतर पंच यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.

सरकारी वकील केतन ढाके यांचा प्रभावी युक्तिवाद
खटल्याच्या सुनावणी जिल्हा सरकारी वकील यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. युक्तिवादातून मांडलेल्या सर्व पुराव्यावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे यांनी आरोपीला दोषी ठरवून यश उर्फ गोलू चंद्रकांत पाटील याला अल्पवयीन पीडित मुलगा यांच्यावरील अनैसर्गिक अत्याचार करून खून केल्या प्रकरणी आजन्म अर्थात मरेपर्यंतची जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच 1 लाख 15 हजाराचा दंड सुनावली. सदर खटल्यात सरकार पक्षाकडून जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी काम पाहिले.

डांभुर्णीनंतर भोकरच्या हत्येचाही झाला उलगडा-
आरोपी यशला अटक केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला जळगावात आणले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने जळगाव तालुक्यातील भोकर येथील एका अल्पवयीन बालकाची क्रूरपणे हत्या केल्याची कबुली दिली. भोकर येथील बालक हा 12 मार्चरोजी अचानक बेपत्ता झाला होता. तर त्यानंतर 16 मार्च रोजी भोकर शिवारातील एका शेतात अल्पवयीन मुलाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला होता. त्याची अनैसर्गिक अत्याचार केल्यानंतर गळा दाबून हत्या झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले होते.

आरोपी बालकांवर करायचा अनैसर्गिक अत्याचार –
आरोपी यश हा वासनांध झाला होता. तो लहान बालकांवर अनैसर्गिक अत्याचार करायचा. बालकांना खाऊचे आमिष दाखवून त्यांना निर्जनस्थळी न्यायचे, त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करायचे आणि त्यानंतर हा प्रकार कोणाला कळू नये म्हणून त्यांची निर्घृणपणे हत्या करायची, अशी आरोपी यशची गुन्हा करण्याची पद्धत पोलीस तपासातून समोर आली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
Next Post

राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार? ; मुंबई सत्र न्यायालयाकडून नोटीस जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मौनी अमावस्येनिमित्त काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींनी प्रयागराजमध्ये केले गंगास्नान

February 11, 2021

बीएचआर घोटाळा : आमदार चंदूलाल पटेल यांचा अटकपूर्व जामीन मंजूर ; अॅड.अनिकेत निकम यांचा प्रभावी युक्तिवाद !

August 16, 2021

डुकरांच्या कळपानं लचके तोडल्याने झाडाखाली झोपलेल्या तरुणाचा मृत्यू ?

November 12, 2023

जळगाव जिल्ह्यात बालविवाह, हुंडा प्रतिबंधक कायद्याची होणार कडक अंमलबजावणी !

December 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group