चोपडा (प्रतिनिधी) येथील ग्रामसेवक कॉलनीत बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी ७० हजाराचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, ग्रामसेवक कॉलनीतील संजय भिलाजी पाटील हे देव दर्शनासाठी परिवारासह पंढरपूर गेले होते. नेमकी हीच संधी चोरट्यांनी साधत घराचे कुलूप तोडून ५५हजार रुपये रोख ,सोनी कंपनीचा एलईडी टीव्ही, प्रत्येकी चार भार वजनाची गणपतीची व लक्ष्मीची मूर्ती तसेच आत्माराम मोहन कोळी (रा.ग्रामसेवक कॉलनी) यांच्या घरातून देवघरात ठेवलेले ५ हजार २०० रुपये रोख असा दोन्ही घरातून एकुण ७०हजार रुपयाचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झालेत.
घटना सकाळी त्याच्या शेजारी दिलीप जोशी (महाराज) आत्माराम मोहन कोळी यांचा निदर्शनास आली. त्यांनी फोनवर घरमालकाला घराचे कुलूप तुटलेले असल्याची माहिती दिली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोपडा शहर पोलिस ठाण्यात भादवी कलम ४५४,४५७,३८०प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, वाढत्या चोरीचा घटनेमुळे कॉलनी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आले .