फैजपूर (प्रतिनिधी) येथील श्रीकृष्ण नगरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडत सोने-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण १ लाख १९ हजाराचा ऐवज लंपास केला आहे.
या संदर्भात अधिक असे की, शहरातील श्रीकृष्ण नगरात चेतन अरुण तळेले (वय ३८, रा. प्लॉट नं ३०) हे वास्तव्यास आहेत. दि. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ६.३० वाजता ते दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजीचे सकाळी ७.०० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेत लाकडी दरवाजाचा कोयंडा तोडत घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील दोन तोळे वजनाची सोन्याची चिप, सोन्याचे मंगळसूत्र, दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले जोड, दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले जोड, दोन ग्रॅम वजनात बनवलेले पट्टा-पोत मंगळसूत्र, चांदीची आठ भार वजनाची महादेवाची पिंड, दोन भार वजनाचे चांदीचे पायातले पैंजण आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख १९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक मोहन लोखंडे हे करीत आहेत.