धरणगाव (प्रतिनिधी) शहरालगत चोपडा रोडवरील शगुन कोटेक्स प्रा.लि. नावाच्या कापूस जिनिंगमध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल ७२ हजाराच्या गठाणी लंपास केल्या आहेत.
या संदर्भात अधिक असे की, धरणगाव-चोपडा रोडवरील पिंपळे शिवारातील शगुन कोटेक्स प्रा.लि. नावाच्या कापूस जिनिंगचे तार कंपाऊंड तोडून अज्ञात चोरट्यांनी ७२ हजार किंमतीच्या एकूण ८ गठाणी चोरून नेल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ ते १८ फेब्रुवारीच्या सकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत शगुन जिनिंगचे संचालक किरण दयाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार करीम सैय्यद हे करीत आहे.