चाळीसगाव (प्रतिनिधी) मेडिकलचे लोखंडी पत्रे उचकटुन दुकानाच्या आत प्रवेश करुन अज्ञात चोरट्यांनी ६ लाखाची रोकड आणि सोन्याची पोत असा एकूण ६ लाख ८० हजाराचा ऐवज लंपास केला आहे.
या संदर्भात अधिक असे की, राजरत्न सुधाकर पाटील (वय ३०, रा. लक्ष्मीनगर, देवकर मळ्याजवळ चाळीसगाव) यांचे गणेश रोडवरील कॉम्प्लेक्स समोर द्वारका नावाचे मेडीकल आहे. दोन अज्ञात चोरट्यांनी दि. १६ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री ३.०० वाजेच्या सुमारास मेडिकल शॉपचे छताचे लोखंडी पत्रे उचकटुन दुकानाच्या आत प्रवेश केला. त्यानंतर मेडिकलमधील ६ लाख रुपयाची रोकड आणि ८० हजार रुपये किंमतीची चार तोळे वजनाची सोन्याची पोत, असा एकूण ६ लाख ८० हजार रुपयाचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यता आला असून पुढील सपोनि ढिकले हे करीत आहेत.