अमरावती (वृत्तसंस्था) दारूच्या वादातून एका तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास परतवाडा ठाण्याच्या हद्दीतील बेलखेडा येथे घडली. या प्रकरणी श्रीराम उमरकर (३५ रा. बेलखेडा) असे मृतक तर राजा ठाकूर भुसूम (२५ रा. बेलखेडा), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सोमवारी सायंकाळी मनोजने राजाला दारू पाज, असे म्हटले. राजाने त्यास नकार दिल्यावर मनोजने त्याच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द उच्चारले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादात राजाने जवळील दगड उचलून दुपट्यात बांधले आणि त्याद्वारे त्याने मनोजच्या डोक्यावर वार केला. त्यात मनोजचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच परतवाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी सूर्या हरिराम उमरकर (वय ३५ रा. बेलखेडा) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी राजाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.