धरणगाव (प्रतिनिधी) येथील नगरपालिकेतील सेवानिवृत्त ५४ कर्मचाऱ्यांची रजा रोखी करणाची रक्कम अजूनपर्यंत प्राप्त झालेली नाही. यामुळे धरणगाव पालिकेजवळ ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून हे कर्मचारी आमरण उपोषणास बसणास बसलेले आहेत.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी वयाचे ६० ते ६२ वर्ष ओलांडलेली आहेत. मधुमेह, उच्च रक्तदाब अशा अनेक व्याधींनी ते ग्रस्त आहेत. अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या हक्काच्या न्याय मागणीसाठी उपोषणास बसावे लागत आहे, याची पालिका प्रशासनाने दखल घ्यावी व रजा रोखीकरणाच्या रकमा त्वरित द्याव्यात, अशी मागणी या वेळी करण्यात आली आहे.
या आमरण उपोषणाला बाबूसाहेब तडवी यांच्यासह प्रमुख प्रवीण देशपांडे, दीपक चौधरी, दिलीप बडगुजर, अर्जुन पाटील, हिरालाल चौधरी, रामराव भदाणे, प्रदिप गुप्ता, सुरेश कदम, एस. आर. चव्हाण, सुखदेव मराठे, भगवान बडगुजर, दिलीप पाटील, जयेश भावसार, भगवान मिस्त्री, सुरेश बडगुजर, अरुण बयस, रघुनाथ कोळपे, अ. वहेद अ. रशिद व इतर कर्मचारी बसलेले आहेत. याबाबत धरणगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार म्हणाले की, शासनाकडून अनुदान आल्यावर सर्व कर्मचाऱ्यांना रोखीच्या रक्कम देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.