धरणगाव (प्रतिनिधी) शेतकरी हवालदिल झाले असून शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शिवसेना सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केली आहे. ते आज धरणगावातील एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
धरणगाव येथे आज शिवसेनाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत गुलाबराव वाघ यांनी विविध विषयांवर विस्तृत माहिती दिली. यावेळी श्री. वाघ म्हणाले की, सध्या शेतकरी हवालदिल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच धरणगाव शहरतील उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाल्याची घोषणा मंत्री गुलाबराव पाटील करत आहेत. परंतु धरणगाव शहरतील ग्रामीण रुग्णालयात आधीच सुविधांचा अभाव आहे. तेथे डॉक्टर नाहीत, एक्स रे मशीन असून ऑफरेटर नाही. उपजिल्हा रुग्णालय होईल तेव्हा होईल, परंतु जो सद्यस्थितीत दवाखाना आहे, त्यात सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. धरणगाव शहरतील पाणीपुरवठा योजनेवर श्री.वाघ यांनी धरणगाव शहरात पाणी सध्या 14 दिवसांनी येत आहे. परंतु मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांना दोषी ठरवले. यावेळी श्री. वाघ यांनी गुलाबराव पाटील यांनी पाणीपुरवठा योजनेचा उद्घाटनवेळी गावातील जे रस्ते खोदले जातील, ते लगेच बुजून रस्ते बनवले जातील, असे सांगितले होते. परंतू त्यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांना काळे झेंडे दाखवणारे आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसत आहेत. हे कोणते लक्षण आहे?, असा सवाल देखील श्री. वाघ यांनी उपस्थित केला.
ना. गुलाबराव पाटील यांनी आढावा बैठकीत सध्या दोन गुलाब मतदार संघात फिरत असल्याची टीका केली. परंतु गुलाबराव पाटील यांनी मागील काळात मी पवार साहेबांमुळे मंत्री झालो. तसेच गुलाबराव वाघ यांच्यामुळे मी मतदारसंघात निश्चित राहतो. अगदी गुलाबराव वाघ म्हणजे लोकनेते असे म्हटले होते. परंतु मग आताच काय झाले? असा प्रश्न श्री. वाघ यांनी उपस्थित केला. त्यामुळे जनता सुज्ञ आहे, वेळ आल्यावर कळेल असेही श्री. वाघ यांनी यावेळी म्हटले. तसेच महाराष्ट्राचे प्रोजेक्ट ज्यापद्धतीने गुजरात नेले जाताय त्याच पद्धतीने धरणगाव शहरतील प्रोजेक्ट पाळधीत नेले जात असल्याचा गंभीर आरोप श्री.वाघ यांनी केला आहे. यावेळी अँड शरद माळी, राजेंद्र ठाकरे, भागवत चौधरी, जितेंद्र धनगर, धिरेंद्र पुरभे, उमेश चौधरी, रवी जाधव, सागर ठाकरे, महेंद्र चौधरी, गणेश चौधरी, संतोष महाजन, बापू महाजन, गणेश महाजन यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्तेउपस्थित होते.