जळगाव (प्रतिनिधी) अत्तरदे फाऊंडेशन अमेरिका यांच्या मुख्य मदतीने तसेच ग्लोबल लेवा पाटीदार फाऊंडेशन, अ. भा. लेवा विकास महासंघ व सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय संस्था जळगाव संचालित “स्व. आय.पी.अत्तरदे व स्व.निखिलभाऊ खडसे ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर व बायपॅप सेवा” कार्यक्रमात गरजू रुग्णांसाठी २१ बायपॅप मशीन व १४ ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर मशीनचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमात माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षाताई खडसे, माजी आ.गुरुमुख जगवानी, जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, डॉ. ए.जी.भंगाळे, विष्णू भंगाळे, महापौर जयश्री महाजन, ललित भैय्या चौधरी, माजी उपमहापौर सुनिल खडके, माजी महापौर सिमा भोळे, सुनिल भंगाळे, किशोर ढाके, डॉ. स्नेहल फेगडे, धनंजय चौधरी, संजय कोल्हे, धनंजय कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.