TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बुद्ध पौर्णिमेनिमित्त चाळीसगाव येथील महात्मा फुले जनआरोग्य शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपकरणांचे लोकार्पण संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
May 26, 2021
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) आज संपूर्ण जगात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जात आहे. या मंगल दिनाचे औचित्य साधून चाळीसगाव तालुका बौद्ध पंचायतच्यावतीने चाळीसगाव येथील नुकतेच कार्यान्वित झालेल्या महात्मा फुले जन आरोग्य शासकीय रुग्णालयात मल्टी पॅरा मॉनिटर या वैद्यकीय उपकरणांचे ५ संचांचे लोकार्पण करण्यात आले.

या समाजोपयोगी व विधायक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायतचे अध्यक्ष, माजी आमदार प्रा. साहेबराव घोडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसील अमोल मोरे, शहर पोलीस स्टेशनचे पो. नि. विजयकुमार ठाकूरवाड हे होते. या मान्यवरांचे हस्ते हे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन बौद्ध पंचायत चे सरचिटणीस व कार्यक्रमाचे संयोजक धर्मभुषण बागुल यांनी केले.

READ ALSO

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

कोरोना योद्ध्यांचा गौरव

याप्रसंगी, चाळीसगाव तालुक्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ही सर्व सामान्य लोकांसाठी सतत सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा देखील बौद्ध पंचायत च्यावतीने सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. त्यात प्रामुख्याने आयु. वर्धमान धाडीवाल समाज देवक, आयु. दिलीप घोरपडे सह्याद्री प्रतिष्ठान, आयु. लक्ष्मण शिरसाठ, संभाजी सेना आयु. गणेश पवार, रयत सेना आयु.पंकज पाटील लाईफ सेव्हर गृप, आयु. मुराद पटेल रहा अपडेट गृप आणि तेली समाजाच्यावतीने प्रातिनिधिक म्हणून आयु. सदानंद चौधरी व त्यांचे सहकारी यांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाबद्दल उपस्थित मान्यवरांनी बौद्ध पंचायतीचे कौतुक केले आणि आयोजंकांची मुक्त कंठाने प्रशंसा केली. या उपक्रम साकार व्हावा म्हणून सर्व स्तरातील बौद्ध बांधवांनी सढळ हस्ते सहकार्य केल्याचे यावेळी आयोजकांनी मनोगतात बोलून दाखविले व त्यांचे सर्वांचे आभार मानले. तसेच याप्रसंगी, कोरोनाच्या काळात गेले एक दीड वर्षापासून ज्येष्ठ शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूराव बाविस्कर यांनी बजावलेल्या सेवेचा उल्लेख करून अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतात त्यांचा देखील गौरव केला व त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याला उजळणी दिली.

बौद्ध पंचायतीचे पदाधिकारी आयु. प्रभाकर जाधव, आयु. रामचंद्र जाधव नगरसेवक, आयु. गौतम झाल्टे, आयु. महेश चव्हाण, आयु. गौतम जाधव, आयु. ऍड. राहुल जाधव, किरण जाधव, स्वप्नील जाधव यांचे हस्ते प्रमुख अतिथिंचा सत्कार करण्यात आला. बौद्धाचार्य भैय्यासाहेब ब्राम्हणे यांनी बुद्ध वंदना करून कार्यक्रमाचा प्रारंभ केला. पंचायतीचे पदाधिकारी आयु. रामचंद्र जाधव, गौतम जाधव, राहुल जाधव, स्वप्नील जाधव यांचे सह संजय केदार, विष्णु जाधव, प्रदीप चौधरी व अनेक तरुण सहकाऱ्यांनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. तर कारभारी केदार, प्रकाश सोनवणे, आनंद ढिवरे, विजय जाधव, शरद जाधव, संजय सोनवणे आदी सहकारी उपस्थित होते.

शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूराव बाविस्कर, डॉ. मंदार करंबळेकर व कर्मचारी आयु.रणजित गव्हाळे व त्यांचे सहकारी यांनी व्यवस्थापन करण्यासाठी चोख मदत केली. हा कार्यक्रम पार पाडताना शासकीय निर्बंध काटेकोर पाळण्यात आले. उपस्थित सर्वांना सॅनिटायझर व मास्क पुरविण्यात आले होते. व फिजीकल डिस्टन्स राखण्यात आले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
गुन्हे

चाळीसगावात बेकरी कामगारावर कोयत्याने हल्ला

June 6, 2026
गुन्हे

गतीरोधक तोडल्याच्या वादातून शेतकऱ्यास मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 6, 2026
Next Post

जळगावातील प्रसिद्ध व्यावसायिक मुकेश टेकवानी यांना धमकविल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

टोकयो ऑलिम्पिक : पीव्ही सिंधूला ब्रॉन्झ मेडल, देशाला तिसरे पदक !

August 1, 2021

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या कामाचा मोबदला अदा करावा

March 27, 2021

आधारभूत किंमतीपेक्षा कमी भावात तूर खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करा : आ.एकनाथराव खडसे !

July 5, 2024

जळगाव जिल्ह्यातून तीन गुन्हेगारांची टोळी हद्दपार !

May 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group