धरणगाव (प्रतिनिधी) ठेकेदार, कृषी अधिकारी यांच्या संगणमताने होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवण्याची मागणी होत आहे.
कृषक भारती को ऑपली (हभको) कंपनीने ट्रान्सपोर्टसाठी ठेकेदार नियुक्त केले असून त्याच्या दर सुद्धा कंपनीने निश्चित केला आहे. 0 ते 7 किलोमीटर 70 रुपये प्रति टन 8 ते 15 किलोमीटर 200 रुपये प्रति टन 16 ते 25 किलोमीटर 250 रुपये प्रति टन 26 ते 50 किलोमीटर 320 रुपये प्रति टन 70 किलोमीटर 660 रुपये प्रति टन, असे दर असताना ठेकेदार सरसकट 450 रुपये प्रति टन प्रमाणे ट्रान्सपोर्ट फी आकारत आहेत. आतापर्यंत 10 ते 12 हजार मेटल ट्रान्सपोर्ट फी आकारण्यात आली आहे. त्यासाठी 450 रुपये प्रति टन घेण्यात आले आहेत. युरियाच्या रॅकमध्ये हॅण्डलिंग कंपनी देत असताना 100 रुपये टना प्रमाणे ठेकेदार मनमानीने आकारणी करत आहेत, असे का? या सर्व संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.