जळगाव (प्रतिनिधी) उन्हाळी हंगामातही सोयाबीन पिकाची लागवड करणे शक्य आहे. तसेच पुढील हंगामासाठी उत्कृष्ट प्रतीची उगवण क्षमता असणारे बियाणे जतन करुन ठेवता येईल. यासाठी शेतकरी बांधवांनी सहकार्य करावे. असे आवाहन संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
सोयाबीनसाठी उन्हाळी हंगामाच्या तुलनेत खरीप हंगाम अनुकुल मानला जातो, परंतु पाण्याची उपलब्धता असल्यास उन्हाळी हंगामातही सोयाबीन पिकाची लागवड करणे शक्य आहे. यासाठी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सोयाबीन पिकाची पेरणी करावी. जेणेकरुन एप्रिल महिन्यापर्यंत तापमान वाढण्यापूर्वी पीक काढणीस तयार होते. यामधुन पुढील खरीप हंगाम २०२१ मध्ये लागवडीसाठी कमीत कमी १०० किलो सोयाबीन बियाणे यामधून राखीव ठेवता येईल. यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाण्याचा तुटवडाही भासणार नाही. पुढील हंगामासाठी उत्कृष्ट प्रतीची उगवण क्षमता असणारे बियाणे जतन करुन ठेवता येईल. यासाठी शेतकरी बांधवांनी सहकार्य करावे. असे आवाहन संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.