पंढरपूर (वृत्तसंस्था) संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे आगमन झाले. सोहळ्यासाठी आळंदी नगरी सज्ज झाली आहे. येथे जमलेल्या वारकर्यांची गर्दी जणू काही भक्तीसागराप्रमाणेच भासत होती. मंदिराबाहेर देखील वारकर्यांच्या गर्दीचा भक्तीसागर पहायला मिळाला. पालखी प्रस्थानसोहळ्यानिमित्त आळंदीतील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलिंचे मंदिर आकर्षक फुलांनी सजविण्यात आले.
माऊलींच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होत असल्याने पालखी सोहळा आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे पालखी सोहळ्याला बंदी होती. पालखी सोहळ्याला परवानगी मिळाली. हाती भगव्या पताका घेऊन टाळ-मृदुनगाच्या गजरात वारकऱ्यांनी एकाच ठेका धरला होता. यावेळी सर्वांच्या मुखी ज्ञानोबा माऊलीचा जयघोष ऐकू येतो. त्यातच येथील टाळ मृडुंगाच्या गजराने आसमंत दुमदुमून गेले होते. देहूगावातील वातावरण चैत्यन्यपुर्ण झाले होते. त्यामुळी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून वारकरी देहूनगरीत दाखल झाले होते.
डोक्यावर पांढरी टोपी, खांद्यावर उपरणे, हाती भगव्या पताका, गळ्यात तुळशीहार, वीणा आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन हजारो वारकरी अलंकापुरीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी जमले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या वैष्णवांच्या मांदियाळीने इंद्रायणी काठ गजबला आहे. उंच पताका झळकती, टाळ-मृदंग वाजती’, अशा हर्षोल्हासित आणि पावसाळी वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आषाढी वारीसाठी निघाली आहे. पालखी सोहळ्याचे ३३७ वे वर्ष पूर्ण झाले आहे.