TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेरमध्ये भव्य शिवसृष्टी आणि भीमसृष्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण !

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खा. छत्रपती उदयनराजे भोसले, खा. स्मिता वाघ, आ. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची उपस्थिती !

vijay waghmare by vijay waghmare
October 12, 2024
in जामनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत. त्यांच्या कार्य आणि विचाराची प्रेरणा घेवूनच आम्ही काम करतो. घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याची ओळख संविधानातून करून दिली. अशा दोन आदर्श युगपुरुषांचे अत्यंत भव्य स्मारकं जामनेर मध्ये झाली, याचा आपल्याला आनंद झाला असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जामनेर येथील सोनबर्डी टेकडी परिसर विकास अंतर्गत शिवस्मारक (शिवसृष्टी) आणि भीमस्मारक ( भीमसृष्टी ) लोकार्पण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खा. छत्रपती उदयनराजे भोसले, खा. स्मिता वाघ, आ. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आ. सुरेश ( राजू मामा) भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जामनेर शहरात जी भव्य छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवसृष्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भीमसृष्टी आपण निर्माण केली आहे. ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये देव, देश आणि धर्मावर सातत्याने आक्रमण होत असताना, महिलांची विटंबना होत असताना. सर्व सामर्थ्याने लढा देऊन रक्षण केले आणि स्वराज्य स्थापन केले. अशा आपल्या राज्यांचे 350 वे राज्याभिषेक वर्ष असताना अशी भव्य शिवसृष्टी निर्माण केली हे अत्यंत आनंददायी आहे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्य काय असतात हे संविधानातून दाखवून दिले. अशा या महामानवाच्या विचाराचे सदैव स्मरण करू देणारी भीमसृष्टी उभी केली.

या शासनाने शेतकऱ्यांच्या , कष्टकऱ्यांच्या, महिलांच्या जीवनात बदल करण्यासाठी योजना आखल्या म्हणजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखविलेल्या विचाराने वाटचाल करत आहोत आणि पुढेही असेच काम करत राहू असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व्हावे हे आम्हा जामनेरकरांचे स्वप्न होते ते आज पूर्णत्वास आले असून थोड्याच दिवसात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह, अहिल्यादेवी होळकर, महाराणा प्रताप, वसंतराव नाईक यांचे भव्य स्मारक तसेच संत सेवालाल महाराज यांची सृष्टी तयार करणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

यावेळी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे यांनी जामनेर शहरात उभे असलेले दोन्ही स्मारकं आणि जामनेर तालुक्याचा झपाट्याने होणाऱ्या विकास यावेळी अधोरेखित केला. खा.छत्रपती उदयनराजे भोसले आणि आ. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनीही ग्रामविकास मंत्री यांच्या कार्याचे कौतुक करून भव्य स्मारक उभं केल्याबद्दल अभिनंदन करून सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.

कशी आहे शिवसृष्टी !

छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठीत पूर्णाकृती साधारणतः १६ फुट उंचीचा ब्रांझ धातुचा पुतळा व सिहासन ३२ फुट आहे

हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या नगारखानासहित वाड्याची भव्यदिव्य प्रतिकृती साकार केली आहे.

या मराठामोळ्या शैलीच्या वाड्याची लांबी १०० फूट आहे आणि यात तळ मजल्यावर १२ खांब आणि पहिल्या मजल्यावर २४ खांब आहेत. वाड्याच्या बाजूच्या भिंतीची लांबी ५० फूट असून उंची वाड्याची तटबंदी धरून साधारण ३८ फूट आहे.

कशी आहे भीमसृष्टी !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती साधारणतः १५ फुट उंचीची संविधान घेतलेली आणि राष्ट्राला उद्देश करत असलेली ही पूर्णाकृती भव्य मूर्ती साकार केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या २४ मुद्रा या त्यांना असलेल्या २४ उपाध्यांसहित कायमस्वरूपी अशा स्टील प्लेट्सवर महान विभूती गौतम बुद्धांच्या बोधिवृक्षाच्या पिंपळ पानांवर केल्या आहेत.

डॉ. बाबासाहेबांच्या मूर्तीमागे संविधान चक्र केले असून त्यामागे बोधिवृक्ष साकार केला आहे. यातून महान गौतम बुद्धांच्या आशीर्वादाचे प्रतिबिंब आपल्याला दिसते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 सप्टेंबर 2026 !

September 25, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
Next Post

आहिर नाभिक समाज मंडळाच्या सभागृहाचे प्रतापराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण ; जाणून घ्या..आजचा सोने-चांदीचा भाव

January 28, 2022

ब्रेकिंग न्यूज : शरद पवारांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्तीची घोषणा !

May 2, 2023

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026

डॉ. हेडगेवार नगर येथे १९ कोटीच्या पाणी पुरवठा योजनेचे पालकमंत्री व मदत पुनर्वसन मंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन !

February 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group