धरणगाव (प्रतिनिधी) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब किसन चौधरी यांच्या मुलाचा आज विवाह सोहळा आहे. धरणगाव जवळील श्रीजी जिनिंग परिसरात हा विवाह समारंभ होणार आहे. या विवाह सोहळ्यास आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील दिग्गज मंत्र्यांची उपस्थिती असणार आहे.
या विवाह सोहळ्यास भाजपचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, पाणी पुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल भाईदास पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार अतुल सावे, मंगल प्रभात लोढा यांच्यासह राष्ट्रीय स्वलांसेवक संघाचे सहसर कार्यवाह अतुल लिमये, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्य सदस्य शरदराव ढोले यांच्या सह अनेक राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकारी सहभागी होणार आहे. धरणगाव येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाळासाहेब चौधरी यांचा मुलगा चकोर चौधरी यांचा विवाह धरणगाव येथे होत आहे. यानिमिताने राज्यातील मंत्री खासदार, आमदारांसह संघाचे अनेक पदाधिकारी येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी जम्मत तयारी करण्यात आली आहे.
















