मुंबई (वृत्तसंस्था) निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पुन्हा कोर्टाने ९ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी ठोठावली आहे. आपल्या नियुक्तीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. ते आपल्याला हटवू इच्छित होते. त्यांचं मनधरणी करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केली होती,” असा आरोप सचिन वाझे यांनी एनआयएला लिहिलेल्या पत्रात केला केला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यानंतर निलंबित पोलीस अधिकारी वाझेंनींही ‘लेटरबॉम्ब’ टाकला आहे. सध्या एनआयएच्या कोठडीत असलेल्या वाझे यांनी एनआयएला एक पत्र लिहिलं आहे. त्यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी आपल्याकडे २ कोटींची मागणी केल्याचं वाझेनी सांगितलं आहे. ‘निलंबन टाळायचं असेल तर दोन कोटी द्या’, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुखांनी आपल्याकडे केल्याचं वाझे यांनी म्हटलं आहे. ‘आपल्याला एवढी मोठी रक्कम देता येणार नसल्याचं सांगितलं. त्याबरोबरच अनिल देशमुखांनी प्रत्येक बारमधून साडेतीन लाख वसूल करून आणा’, असंही सांगितल्याचं सचिन वाझेनी नमूद केलं आहे.
वाझेंच्या जबाबामध्ये शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांचंही नाव आहे. अनिल परब यांनीही आपल्याला खंडणी वसून करायला सांगितलं, असा खळबळजनक आरोप वाझेंनी सादर केलेल्या पत्रातून केला आहे.
सचिन वाझेंच्या कोठडीत ९ एप्रिलपर्यंत वाढ
सचिन वाझेंच्या एनआयए कोठडीत ९ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तसेच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांबद्दल सचिन वाझे यांची चौकशी करण्यास देखील CBI ला परवानगी देण्यात आली आहे. NIA कस्टडीतच सीबीआय परमबीर सिंह यांच्या देशमुखांवरील आरोपांची वाझेंकडे चौकशी करणार आहे. वेळ सीबीआयनं एनआयएसोबत बोलून ठरवावी असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
















