जळगाव (प्रतिनिधी) जोशी कॉलनी येथे वासुदेव जोशी समाजसेवा संघ आयोजित गुरू गोरक्षनाथ मंदिरात मंगळवारी रासगरब्यात भाविक व महिला भक्तिरसाने न्हाऊन निघाले.
यावेळी श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाहाचे आयोजन केले होते.
ह.भ.प. मनोजचंद्र महाराज वृंदावन यांच्या संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कथानुरुप झाकी सादर करण्यात येत आहेत. यावेळी श्रीकृष्णाच्या रास गरबा तसेच श्रीकृष्ण रुक्मिणी विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला मंडळातर्फे प्रसादाचे वाटप करण्यात आले. प्रसंगी उद्योजक प्रकाश बालानी,ज्येष्ठ समाजसेवक ए.एफ.जोशी व मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. दरम्यान रात्री ८ वा. ह.भ.प. श्रीराम महाराज,श्रीराम मंदिर जुने जळगाव यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. आज बुधवारी भागवत ग्रंथ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.