धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी गावाच्या पुढे पथराडजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जण जखमी झाले होते. यातील एक जखमी झालेल्या झुरखेडा येथील तरुणाचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. धरणगाव पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर सुभाष गोसावी (वय-३४, रा. झुरखेडा ता. धरणगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
ज्ञानेश्वर गोसावी हे बांभोरी येथील हिताची कंपनीत नोकरीस होते. ते दिनांक ७ रोजी कामावरून घरी जात असताना पाळधीपासून तीन किमी अंतरावर पथराड गावाजवळ त्यांच्या दुचाकी (एमएच-१९, बीसी -९६८१) ला समोरून येणाऱ्या दुचाकी स्वाराने धडक दिली. यात ज्ञानेश्वर यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तब्येत खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील के.ई.एम. रुग्णालयात दाखल केले होते; मात्र १४ जुलै रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी याप्रकरणी पोलीस स्टेशनला नोंद केली आहे. ज्ञानेश्वर यांच्या पश्चात आई-वडील पत्नी, मुलगा, मुलगी, एक भाऊ असा परिवार आहे.