जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील धरणगावात एरंडोल रस्त्यावरील हेडगेवार नगरजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली, तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. २२ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास धरणगावात एरंडोल रस्त्यावरील हेडगेवार नगरजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर नागरिकांनी तत्काळ जखमींना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी संबंधित महिलेला मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच धरणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत केली.