धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील शिकलकर परिसरात एकास धारदार कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.
विजयसिंह अजयसिंग टाक (२०) याच्यावर आरोपी कर्तारसिंग गुरुमुख सिंग याने धारदार कोयत्याने हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु तो त्याने चुकविल्याने त्याचा जीव बचावला. कर्तारसिंग यास पोलिस निरीक्षक पवन देसले, उपनिरीक्षक संतोष पवार, हवालदार सुधीर चौधरी, सत्यवान पवार, चंदन पाटील, संदीप पाटील यांच्या पथकाने ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीकडून कोयता, चाकू, सुरा तसेच दुचाकी जप्त करण्यात आली आहे. तपास पोउनि संतोष पवार करीत आहेत.