धरणगाव (प्रतिनिधी) येथील बडगुजर समाजाची नुकतीच सभा होऊन त्यात समाज पंच मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची स्थापना झाली. यावेळी मनोहर गंगाराम बडगुजर यांची अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी संजय पुरुषोत्तम बडगुजर यांची तसेच सुमित महेंद्र बडगुजर यांची सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली.
बडगुजर समाजाच्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी मनोहर बडगुजर, उपाध्यक्षपदी संजय बडगुजर, सेक्रेटरी म्हणून सुमित महेंद्र बडगुजर, सहसेक्रेटरीपदी गणेश सुरेश कोतवाल तर सदस्य म्हणून सुरेश भिका बडगुजर, मुकेश रामदास बडगुजर, रवींद्र विठ्ठल बडगुजर, दिनेश बाजीराव बडगुजर, कैलास मगन बडगुजर, घनश्याम बाबुलाल बडगुजर, संजय सीताराम बडगुजर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सर्व अध्यक्ष व पंच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे गावातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.