धरणगाव (प्रतिनिधी) नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पार्टी धरणगाव तालुकाच्या वतीने निदर्शने घोषणाबाजी करण्यात आली. कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने १९९३ बॉम्बस्फोटातील सहभागी गुन्हेगारांशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणी अटक केली. कोर्टाने त्यांना ३ मार्चपर्यंत कोठडी दिली.
अनिल देशमुखांचा राजीनामा ताबडतोब घेणारे शरद पवार हे नवाब मलिकांच्या बाबतीत वेगळा निर्णय करत आहेत. विशिष्ट समुदायाला दुखावणे त्यांना जमणार नाही. पण महाराष्ट्रातील राष्ट्रीय विचारांची जनता हे सहन करणार नाही. हा राष्ट्राच्या सुरक्षेचा विषय आहे, राष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे नवाब मलिकांचा राजीनामा होईपर्यंत निदर्शने केली जाईल. निदर्शने करतेवेळी जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.पाटील, ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, अँड.वसंतराव भोलाने, प्रकाशदादा सोनवणे, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, ललित येवले, शरद अण्णा धनगर, कडू बयास, सुनील चौधरी, किशोर झंवर, निर्दोष पाटील, भालचंद्र पाटील, शिवदास पाटील, कन्हैया रायपूरकर, अनिल महाजन, जुलाल भोई, वासुदेव महाजन, सुदाम मराठे, सचिन पाटील, रवी पाटील, विशाल पाटील, एस.पी.पाटील, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.