धरणगाव (प्रतिनिधी) शहर शिवसेनेच्या उपशहर प्रमुखपदी धरणगाव येथील सुनिता गणेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख सरिताताई माळी कोल्हे यांनी त्यांची निवड केली आहे.
सुनिता पाटील यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील,जिल्हा प्रमुख निलेश पाटील,उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,संजय पाटील सर, विधानसभा क्षेत्र प्रमुख,तालुका प्रमुख डी ओ पाटील,उप तालुका प्रमुख मोती आप्पा पाटील, महिला तालुका प्रमुख पुष्पाबाई पाटील, शिवसेना शहर प्रमुख विलास महाजन,गटनेते पप्पूभाऊ भावे,महिला शहर प्रमुख भारतीताई चौधरी, तालुका संघटक हेमंत चौधरी,शोभाताई चौधरी, प्रियंका कोळी, उषाताई गुरव यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.