धरणगाव (प्रतिनिधी) येथे शासकीय शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नगरपरिषदतर्फे स्व. सलीम पटेल यांच्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराजांचे साकारलेले तैलचित्राचे पूजन नगराध्यक्ष निलेश चौधरी व मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा पूजन शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ व नगरसेवक अहेमद पठाण, बापू परेराव, चंदन पाटील, गोपाल पाटील, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, उपनगराध्यक्ष विलास महाजन, भानुदास विसावे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित नगरसेवक भागवत चौधरी , सुरेश महाजन, भाजपचे गटनेते कैलास माळी सर , गुलाब मराठे , जितेंद्र धनगर, बुट्या भाऊ पाटील,रातीलला नाना चौधरी युवा सेना शहर प्रमुख महाजन, राजेंद्र ठाकरे, गजानन महाजन, निलेश चौधरी, विशाल महाजन, छोटू जाधव, अरविद चौधरी, गोपाल पाटील, नगरपालिकाचे ओ एस संजय मिसर, लिपिक दिपक चौधरी, जयेश भावसार, पी एस चौधरी, युवराज मराठे, शिरीष पाटील, बबलू चौधरी, संजय शुक्ल महाराज, दिपक वाघमारे किशोर महाजन, विक्रात चौधरी व सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग पदाधिकारी उपस्थित होते.