धरणगाव (प्रतिनिधी) येथील नूतन विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणूकीत चुरशीच्या लढतीत ‘माविआ’ पुरस्कृत सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. ६८७ मतदार त्यापैकी ६०२ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. दरम्यान, या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे दिग्गजांनी विजय प्राप्त केला आहे.
नूतन विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणूकीत ‘माविआ’ विरुद्ध भाजपा असा सामना बघायला मिळाला होता. ‘माविआ’ पुरस्कृत सहकार पॅनलचे चिन्ह छत्री तर भाजप पुरस्कृत शेतकरी पॅनलचे चिन्ह कपबशी होते. या लढतीकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले होते. कारण या निवडणुकीकडे नगरपालिकेची रंगीत तालीम म्हणून बघितले जात होते. मतमोजणीनंतर अखेर ‘माविआ’ पुरस्कृत सहकार पॅनलचे 12 उमेदवार विजयी झाले तर शेतकरी पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले.
माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी ठरले विजयाचे शिल्पकार
नूतन सोसायटीमध्ये आज महाविकास आघाडी पुरस्कृत सहकार पॅनेलने दणदणीत विजय प्राप्त केला. तर शेतकरी पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. या विजयाचे खरे शिल्पकार माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक सुरेशनाना चौधरी हे ठरले. त्यांनी पहिल्या दिवसापासून निवडणुकीची सर्व रणनीती आपल्या हातात ठेवली होती. तर दुसरीकडे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, काँग्रेसचे डी.जी.पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन यांनी देखील या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली.
जाणून घ्या… विजयी उमेदवारांची नावे !
कर्जदार खातेदारांचे प्रतिनिधी मतदार संघ
बयस विश्वास देवालाल
३०३
चौधरी निलेश सुरेश (लोकनियुक्त नगराध्यक्ष)
३५८
चव्हाण राजेंद्र गुलाबसिंग
२९२
धनगर किशोर दौलत
३०७
महाजन ज्ञानेश्वर भादू, (माजी नगराध्यक्ष)
३१९
मराठे कैलास भाऊलाल
३१६
मराठे शालिक दगा
२८८
पाटील जयराम माणिक
२८६
इतर मागासवर्ग राखीव मतदार संघ
महाजन सुभाष सखाराम
महिला राखीव मतदार संघ
माळी संगिता देवालाल
पाटील सुरेखा भरत
वि.जा. / भ.ज. मतदार संघ
साळी सोमा धनजी
अनु/जाती/अनु. जमाती मतदार संघ
पवार राजेंद्र माणिक
















