धरणगाव (प्रतिनिधी) येथील बस स्थानकाच्या समोरून ओमनी कार चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर चार तासांच्या आत पोलिसांनी आरोपींना अटक केली.
फिर्यादी सत्यवान कंखरे यांची अडीच लाख रुपये किमतीची लाल रंगाचे मारुती कंपनीचे ओमनी गाडी नंबर एमएच ०५ एच ४५०२ ही फिर्यादीच्या संमती वाचून चोरून नेली म्हणून फिर्यादीने दिलेली तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी चंद्रकांत उर्फ गटलू गोरख कोळी यांच्यावर पारोळा पोलीस स्टेशनला चार गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींनी अजून कोण कोणत्या ठिकाणी गुन्हे केले असून त्याचे कोणी साथीदार आहेत का? याबाबत तपास करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांनी सांगितले.
आरोपी चंद्रकांत उर्फ गटलु गोरख कोळी राहणार हनुमान नगर अयोध्या नगर जवळ जळगाव मुळ रा. आजा चौक पारोळा, सुनील उर्फ भुरा हिंमत कोळ राहणार अजिंठा चौगुले जवळ जळगाव यांना पोलीस निरीक्षक पवन कुमार देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष पवार पो हे. महेंद्र बागुल, सत्यवान पवार, महेंद्र चौधरी, सुमित बाविस्कर समाधान भागवत, संजय सूर्यवंशी, अरुण सातपुते यांनी तपास केला. दि.२४ मे २०२५ रोजी १० वाजता दोघ आरोपींना अटक करण्यात आली व त्यांच्याविरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.