धरणगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून निवेदन देण्यासाठी निघण्याआधीच धरणगाव पोलिसांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना तर जळगाव पोलिसांनी देखील जिल्ह्यावरील नेत्यांना ताब्यात घेतले आहे.
शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या लेटरपॅडवर धरणगाव तहसीलदार यांना दि. ११ रोजी मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देण्याची परवानगी मागण्यात आली होती. परंतू परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे आज धरणगाव येथून माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी यांच्यासह माजी नगरसेवक भागवत चौधरी, राहुल रोकडे यांच्यासह आदि कार्यकर्ते भोकर येथे जायला निघाले होते. परंतू तत्पूर्वीच या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर दुसरीकडे जळगाव पोलिसांनी सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.