धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मराठा सेवा संघ पी एम पाटील सर मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने धरणगाव पोलीस निरीक्षक पदी पवन देसले यांची नुकतीच नियुक्ती झाली. त्यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष पी एम पाटील सर यांनी शाल बुके देऊन सत्कार केला व त्यांच्या हातून धरणगाव शहर व तालुक्याची चांगली सेवा घडो ज्याप्रमाणे कोरोना काळमध्ये आपण सेवा केली होती अशीच सेवा पुन्हा होवो धरणगावात शांतता नांदत राहो, अशा त्यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी जळगाव जिल्हा अखिल भारतीय मराठा सेवा संघ महिला सदस्य रेखाताई पाटील, पुष्पाताई पाटील, भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष टोनी महाजन, एम आर भगवान महाजन, महिला तालुकाध्यक्ष सेवा संघ सुनिता पाटील, उपतालुका प्रमुख मनीषा पाटील, धरणगाव तालुका शेतकरी आघाडी तालुका प्रमुख गोविंदा पाटील, दिव्यांग सेनेचे तालुका प्रमुख संजय पाटील, मेडिकल असोसिएशनचे व परीट समाजाचे जिल्ह्याचे नेते छोटूभाऊ जाधव, मूकबधिर विद्यालयाचे आर एस पाटील सर, चंद्रकांत पाटील, किशोर पाटील, बापू जाधव,शेतकी संघाचे संचालक गोपाल पाटील,भारतीय जनता पक्षाच्या युवा नेत्या कुंजल भाटिया, महिला मंडळ सदस्य रजनी सूर्यवंशी मॅडम,शिवसेनेचे रवींद्र जाधव, व्यायाम प्रसारक मंडळाचे सदस्य भरत शेठ, शिवसैनिक भगवान महाजन, सरपंच उगलाल पाटील, लांडगे गल्ली शाखाप्रमुख नगराज पाटील,नगरसेवक नंदकिशोर पाटील,तालुका उपप्रमुख मराठा सेवा संघ भवरखेडा दीपक पाटील,सेवानिवृत्त होमगार्ड अशोक देशमुख,आरोग्य सेवक नामदेव मराठे,उपशहर प्रमुख शिवसेना डी.जे. पाटील, भवरखेडे येथील खुशाल पाटील, शांताराम पाटील, पवन पाटील, शकील पिंजारी आदी उपस्थित होते.