धरणगाव (प्रतिनिधी) येथील ग्रामीण रुग्णालयातून एका कर्मचाऱ्याची दुचाकी लंपास केल्याची घटना १२ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव ग्रामीण रुग्णालयात योगेश चैत्राम पाटील (रा.कापडणे ता. जि. धुळे) हे एक्सरे टेक्निशियन म्हणून कार्यरत आहेत. दि. १२ डिसेंबर रोजी योगेश पाटील हे नेहमी प्रमाणे सकाळी ९.१५ वाजेला ग्रामीण रुग्णालयात कामावर आलेत. रुग्णालयात काम असल्यामुळे त्यांना दुपारपर्यंत बाहेर येण्यास वेळ मिळाला नाही. परंतू अडीच वाजेच्या सुमारास पार्किंगमध्ये लावलेली आपली गाडी बघितली असता आढळून आली नाही. शेवटी योगेश पाटील यांनी १३ डिसेंबर रोजी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.फौ. रामदास पावरा हे करीत आहेत.