धरणगाव (प्रतिनिधी) आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास धरणगाव ग्रामीण रुग्णालय रुग्णालयाला जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी एन. एस चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी चव्हाण यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांचे मनोधैर्य वाढवले.
यावेळी कोविड रुग्णांशी तब्येतीच्या संवाद साधून त्यांना मनोबल अंत देण्याचे काम, जेवणाच्या बाबतीत विचारपूस, डॉक्टरांच्या बाबतीत अशा वेगवेगळ्या पद्धतीने रुग्णांशी जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी संवाद साधला. धरणगाव ग्रामीण रुग्णालयात असलेल्या काही अडचणी जवळपास पूर्ण झालेल्या असून आज ३९ जम्बो ऑक्सीजन सिलेंडर कार्यरत आहेत. जैन समाज संघटना, शिक्षक संघटना यांनी धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला जी काही मदत केली असून त्यांचे देखील जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे आभार मानण्यात आले. धरणगाव तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या पाहता मोठ्या प्रमाणावर कमी झालेले दिसून येते. ग्रामीण रुग्णालयात असलेला कर्मचारी तुटवडा येत्या दोन दिवसात पूर्ण करू, असे देखील आश्वासन जिल्हा अधिकारी यांनी दिले.
यावेळी उपस्थित एन एस चव्हाण, जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बंन्सी, लोकनियुक्त नगराध्यक्ष विवेक चौधरी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, नगरसेवक विलास महाजन, नगरसेवक ललित येवले, सी के पाटील, राष्ट्रीय चर्मकार समाजाचे कार्यध्यक्ष भानुदास विसावे, नगरसेवक भागवत चौधरी, राहुल रोकडे, रवींद्र कंखरे, पंकज शिंदे, गणेश पवार, भाजपचे शहराध्यक्ष दिलीप महाजन, कन्हैया रायपूर आदी उपस्थित होते.