धरणगाव (प्रतिनिधी) तालुका शेतकरी सेना अध्यक्षपदी येथील शेतकरी कापूस उद्योगमध्ये कार्यरत असलेले विनायक शिवदास महाजन यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
विनायक महाजन यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे बाळासाहेब शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख निलेश पाटील, जिल्हा महिला संपर्कप्रमुख सरिताताई महाजन, उपजिल्हाप्रमुख पी.एम. पाटील सर, तालुकाप्रमुख गजानन नाना पाटील, युवानेते प्रताप पाटील, उपतालुकाप्रमुख संजयभाऊ चौधरी, युवासेना उपजिल्हाप्रमुख भैया महाजन, शहरप्रमुख विलास महाजन यांच्यासह सर्व माजी नगरसेवक पदाधिकारी, शेतकरी सेनेचे अध्यक्ष सत्यवान कंखरे सर्व बांधवांनी निवडीबद्दल अभिनंदन केले.