TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

यशवंत जाधव यांना ईडीकडून समन्स ; परदेशातील गुंतवणुकीची चौकशी होण्याची शक्यता

The Clear News Desk by The Clear News Desk
May 25, 2022
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारी (Income Tax raid) करण्यात आल्यानंतर आता ईडी (ED)चा ससेमीरा मागे लागण्याची शक्यता आहे. यशवंत जाधव यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. यशवंत जाधव यांच्या परदेशातील गुंतवणुकीची चौकशी होण्याची शक्यता आहे.

ईडीकडून फेमा कायद्याअंतर्गत जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावण्यात आलं आहे. आयकर विभागाने यशवंत जाधव यांची जी चौकशी केली, यासोबतच कंपनी व्यवहार मंत्रालय अर्थात मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सने त्यांच्या बेनामी कंपनीची चौकशी केली असता, काही मोठी रक्कम त्यांच्या जवळच्या लोकांच्या माध्यमातून गुंतवणूक केली आहे. ही कशी केली होती याची चौकशी ईडी करणार आहे. आयकर विभागानेही याबाबत यशवंत जाधव यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं आहे.

READ ALSO

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

शिवसेनेचे मुंबईतील महत्त्वाचे नेते आणि मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव यांच्या घरावर काही महिन्यांपूर्वी आयकर विभागाने छापा मारला होता. जानेवारी महिन्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचाही गंभीर आरोपही सोमय्यांनी जाधवांवर केला होता. त्यानंतर आयकर खात्याने जाधव यांच्या घरावर छापा मारला होता. त्यानंतर यशवंत जाधव यांच्याशी संबंधित 41 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. भायखळ्यातील 31 फ्लॅट्स आणि वांद्रेतील 5 कोटींचा फ्लॅट आयकर खात्याकडून जप्त करण्यात आला होता.

यशवंत जाधव प्रकरणात आयकर खात्याच्या चौकशीत आणखी काही बाबी उघड झाल्या आहेत. गेल्या 10 दिवसांत तपासाला वेग आला आहे. जाधव यांच्या एकूण संपत्तींची संख्या आता 53 वर पोहचली आहे. यात कैसर बिल्डींगचा समावेश आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी ही इमारत खरेदी करण्यात आली. या एकट्या इमारतीतून 80 कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार उघडकीस आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या 10 दिवसांत आयकर खात्याने प्रत्यक्ष ठिकाणांवर जाऊन स्पॉट तपास करत खातरजमा केली आहे. या चौकशी दरम्यान काही व्यक्तींनी शपथेवर कबुलीनामा दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यशवंत जाधव यांनी काही ज्वेलर्सकडून 6 कोटींच्या दागिन्यांची खरेदी केली. ही खरेदी संपूर्ण रक्कम रोखीने करण्यात आली. यामध्ये एका मध्यास्थामार्फत 1.77 कोटींच्या दागिन्यांची खरेदी करण्यात आली होती. या व्यवहारातही रोखीने पैसे स्वीकारल्याची कबुली या संबंधित ज्वेलर्सने दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
Next Post

'...तर आरएसएससाठी भारत हा फक्त नकाशा' : राहुल गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026

ज्ञानवापी मशिदीच्या निकालावर ओवैसींची प्रतिक्रीया ; म्हणाले…!

May 16, 2022

भुसावळ शहर पोलीस स्थानकास नूतन पोलीस अधीक्षकांची ‘सरप्राईज व्हिजिट’ ; गुन्हेगारीचा घेतला आढावा

September 28, 2020

ब्रेकिंग न्यूज : जिल्हा दूध संघ प्रकरणात गृह सचिवांसह जळगाव पोलिसांना नोटीस बजावण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश ; खडसेंची पत्रकार परिषदेत माहिती ! (व्हिडीओ)

November 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group