धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव शिवसेनेतर्फे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली आहे. धरणगाव न. पा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष शिवसेना उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आज पासून हळद, अद्रक मसाले युक्त दूध वाटप शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. रोज कोविंड सेंटर मसाले युक्त हळदीचे दूध वाटण्याचा कार्यक्रम करण्यात येणार आहे.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, चर्मकार समाजाचे नेते भानुदास विसावे, गटनेते पप्पू भावे, विजय महाजन, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, नगरसेवक भागवत चौधरी, सुरेश महाजन, विलास महाजन, जितेंद्र धनगर, किरण मराठे, धीरेंद्र पुरभे, अजय चव्हाण, राजेंद्र चौधरी, काझी जनाब, शेख कालु, राहुल रोकडे, अरविंद चौधरी आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.