धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यात दिव्यांग यांचा मेळावा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. धरणगाव तालुक्यातील दिव्यांग निराधार ज्येष्ठ नागरिक विधवा यांचा मेळावा नगरपालिका येथे आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, दिव्यांगांच्या ज्या काही समस्या आहेत. त्यांना प्रामुख्याने ३५ किलो धान्य कायमस्वरूपी प्रमाणपत्र यू. डी. आयकार्ड वाटप, तसेच प्रत्येक दिव्यांगांना घरकुल पाच टक्के ग्रामपंचायत निधी या सर्व मागण्या तात्काळ मंजूर करण्यात येतील. तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांनी दिव्यांगांना बाबत प्रश्नाकडे लक्ष देऊन त्यांचे काम करण्याचे आदेश दिले जाईल. एकही दिव्यांग बांधव योजनेपासून वंचित राहणार नाही असे आश्वासन दिले. शिवसेनाप्रमुख गुलाबराव वाघ, महाराष्ट्र दिव्यांग विकास महासंघ संस्थापक अध्यक्ष पी. एम. पाटील, सभापती मुकुंद नन्नवरे, भगवान महाजन, यांनी मार्गदर्शन केले. कासोदा येथील समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी यांना औरंगाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल व पाळधी येथील असलम मनीयार यांना जळगाव येथे समाज भूषण पुरस्कार मिळाल्याने त्यांचाही सत्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी दिव्यांग विकास महा संघ जिल्हाप्रमुख अक्षय महाजन, प्रतिभा पाटील, तालुका अध्यक्ष संजय पाटील, असलम मनियार, संजय घोरपडे, राजू चौधरी, सुकलाल चौधरी, सुरेश अहिरे, लीलाधर ननवरे, चिमण गोंधळे, निर्मला शिंदे, आनंदा सुर्वेकर, नंदलाल कुलथे, वासुदेव वाघ, राजेंद फुलपगार आदी उपस्थित होते.