धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्रामध्ये एकूण २३५९ ग्रामपंचायतींची तर २९५० सदस्य पदांसाठी आणि १३० सरपंच पदाच्या रिक्त जागांवर निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणूका 5 नोव्हेंबर दिवशी होणार आहेत. त्यासाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. जळगाव जिल्ह्यात १६७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तर ८१ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत १२८ रिक्त पदांसाठी निवडणूका होणार आहेत.
धरणगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया देखील पार पडत आहे. आज अंतिम दिवशी या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी तब्बल ८३ तर सदस्य पदासाठी ४४२ अर्ज प्राप्त झाले आहेत. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, पाळधी बु आणि डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतींत सर्वाधिक चुरस असल्याचे चित्र दाखल एकूण अर्जावरून दिसून येत आहे.
धरणगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींची दाखल अर्जांची आकडेवारी !
सतखेडा (सरपंच : ४ , सदस्य : २६ )
तरडे खु, (सरपंच : १ , सदस्य : ७)
निमखेडा (सरपंच : ३ , सदस्य : १२ )
झुरखेडा (सरपंच : ४, सदस्य : १४)
बाभुळगाव (सरपंच : ५ , सदस्य : २८ )
पाळधी बु (सरपंच : ९, सदस्य : ६६)
चांदसर बु (सरपंच : ४ , सदस्य : २८)
डॉ. हेडगेवार नगर (सरपंच : ४, सदस्य : ६६)
वराड खु (सरपंच : १, सदस्य : ६)
वाकटुकी (सरपंच : ६, सदस्य : २३),
टहाकळी खु (सरपंच २ : , सदस्य : १९)
खामखेडा (सरपंच : ३ , सदस्य : ८)
कल्याणे होळ (सरपंच : ६, सदस्य : १९)
फुलपाट (सरपंच : ५, सदस्य : १२)
बोरखेडा (सरपंच : ६, सदस्य : ४३)
अंजनविहिरे (सरपंच : १०, सदस्य : २५)
भोद बु (सरपंच : ८, सदस्य : २४)
भोद खु (सरपंच : २, सदस्य : ८)
बोरगाव बु (सरपंच : ० , सदस्य : २)
वराड बु (सरपंच : ०, सदस्य : ५)
शेरी (सरपंच : ० , सदस्य : १)