धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील टोळी-बांभोरी येथे आज दुपारी शेतातच एका शेतकऱ्याचा अचानक मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
या संदर्भात अधिक असे की, दिपक रामकृष्ण पाटील (वय ४९, रा. बांभोरी ता. धरणगाव), असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. दीपक पाटील हे आज सकाळपासूनच भर उन्हात शेतात काम करत होते. दुपारी शेतातच अचानक ते जागेवर कोसळले. त्यांना रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, उष्माघात सदृश्य लक्षणाने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. धरणगाव पोलिसात योगेश सुभाष पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसात दिलेल्या खबरीमध्ये उष्माघाताने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. दीपक पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
















