धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या तिसऱ्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात उत्कृष्ट असे सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली.
संध्याकाळी एरंडोल रोडवरील सुकमल मंगल कार्यालयामध्ये शाळेचे तिसरे वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी धार्मिक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी विवेकानंद शिक्षक प्रसारक मंडळचे सेक्रेटरी प्रा.आर.एन. महाजन, प्रसिद्ध उद्योगपती नयन शेठ गुजराती, धरणगाव शहराचे पी.आय उद्धव ढमाले, हेडगेवार ग्रामपंचायत सरपंच सविता सोनवणे, प्रसिद्ध उद्योगपती खुजेमा बोहरी, गुरुकुल शाळेचे चेअरमन आनंदराव पवार, शाळेचे व्हाईस चेअरमन मालती ताई पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे प्राचार्य वैशाली नितीन पवार मॅडम आणि शाळेचे संचालक नितीन पवार सर यांनी केले. कार्यक्रमाचे शीर्षक कथा सागर असे ठेवण्यात आले होते. गणेश वंदना करून कार्यक्रमास सुरुवात झाली विद्यार्थ्यांनी रामायण, महाभारत, शिव शंकराची महिमा, देवीची महिमा कॉमेडी नृत्य, देशभक्तीपर नृत्य कव्वाली इत्यादी विविध गीतांवर नृत्य सादर करून प्रेक्षकांची दाद मिळविली. नृत्याचे दिग्दर्शन अक्षय पाटील आणि सागर पवार यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओजस्विनी पाटील तहजीब खाटीक,आणि राधा भंडारी यांनी केले तर आभार प्रदर्शन अंकिता पवार यांनी केले. कार्यक्रमासाठी हितेश पवार, चैताली पवार, कृष्णा पवार, गौरांगी वाघ, राज चव्हाण, हर्षल पाटील, अंकित पवार, हरि वाघ, दिशा पवार, साची पवार स्नेहल भाटिया, संकेत भंडारी, छाया पाटील, अनिता, सिमरन खाटीक, एकता राणी, वेदांती गुजराती, जागृती, मृणाली सोनवणे, तीलोचना बडगुजर, शीला चौधरी ,वैशाली जैन, दिव्या पाटील, पूजा चौधरी, राखी भागवत, सरला ताई आदींनी परिश्रम घेतले.