धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये ‘गांधी रिसर्च फाउंडेशन ‘ यांच्या मार्फत ‘ गांधी विचार संस्कार परीक्षा ‘ नुकतीच घेण्यात आली.
शालेय विद्यार्थ्यांना महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाचा, तत्वविचारांचा परिचय व्हावा उद्देशाने जळगावच्या गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने ही परीक्षा घेतली जाते. शाळेच्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या १७० विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने ही परीक्षा दिली. शाळेचे शिक्षक एस.पी.सोनार यांनी या परीक्षेचे संयोजन केले. यावेळी मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापिका डॉ. आशा शिरसाठ, पर्यवेक्षक कैलास वाघ, ज्येष्ठ शिक्षक डॉ. बापू शिरसाठ,.डी.के. चौधरी, संजय बेलदार, राजेश ठाकरे यांची उपस्थिती होती.