पिंप्री खुर्द ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच गावात झालेले मृत्यु पाहता पिंप्री येथे ग्रामपंचायत प्रशासनामार्फत जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे . सध्या कोरोनामुळे गावात प्रचंड घबराटीचे वातावरण पसरलेले आहे.
दिवसेदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. तसेच गावात कोरोनामुळे झालेले मृत्यु याअनुषंगाने ग्रामपंचायत प्रशासनातर्फे जंतुनाशक फवारणी करण्याचे काम सुरु करण्यात आहे. तरी फवारणी करतेवेळ कोणीही घराबाहेर निघु नये तसेच बिना मास्क कोणीही फिरू नये. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असे आवाहन ग्रामपचायत प्रशासन तसेच ग्रामस्तरीय कोरोना समिती यांच्यातर्फे करण्यात आले आहे.