जळगाव (प्रतिनिधी) येथील कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील उमवि शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या दि. १५ डिसेंबर रोजी झालेल्या द्वार सभेमध्ये विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करून शरद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे.
दिनांक १५ डिसेंबर रोजी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या गेटवर उमवि शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेची द्वारसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत महासंघाचे अध्यक्ष रमेश डोंगर शिंदे यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी पाठपुरावा बाबत जाब विचारला असता ते ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या तीव्र भावना व रोज लक्षात घेता घटक संघटनेचे अध्यक्ष राजू रतन सोनवणे यांनी यावेळी संघटनेची विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर यापुढे कबचौ उमवितील कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, वित्त विभागाने निर्गमित केलेल्या शासन नियमानुसार सुधारित आश्यासित प्रगती योजना लागू करण्यासह इतर सर्व मागण्यांसाठी वरिष्ठ सहाय्यक शरद पंडितराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खालील प्रमाणे स्वतंत्र कृती समिती गठीत करण्यात आली आहे. नवीन कार्यकारणीत शरद पंडितराव पाटील, अनिल शालिग्राम पाटील, सुरेश दंगल राव चव्हाण, जयश्री शिंगारे, अमृत एस. दाभाडे, संजय पांडुरंग सपकाळे, रविंद्र लक्ष्मण फडके, महेश लक्ष्मण पाटील, गोकुळ युवराज पाटील, भीमराव वेडु तायडे, सुरेखा राजेंद्र पाटील, राजेंद्र मुरलीधर पाटील, राजेंद्र दगडू पाटील, विलास रतन बाविस्कर, दुर्योधन बायुराव साळुंखे, शिवाजी नामदेव पाटील, भैय्यासाहेब हिंमतराय पाटील, जगदीश एन. सुरळकर, वैशाली मनोज वराडे, अजमल मंधोर जाधव, सुनील उत्तम निकम यांचा समावेश आहे.