धरणगाव (प्रतिनिधी) नारी शक्तीला स्वावलंबी करण्यासाठी युवा रोजगार अभियान अंतर्गत शहरातील राजपूत समाज मंगल कार्यालय प्रशिक्षण सुरु होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना रविवारी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
पिंपळे, शिरूर, चोपडा, निमगव्हाण, वेल्हाणे, भवरखेडा हनुमंतखेडेसह जळगाव ग्रामीणमध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात खेडोपाडी नारी शक्तीला तिला स्वावलंबी करण्यासाठी प्रक्षिक्षण देण्यात येते आहे. रविवारी ज्यांचे 40 दिवसाचे प्रक्षिक्षण पुर्ण झाले, अशा युवा रोजगार मधील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले. दरम्यान, व्यवसायात कसलीही अडचण आल्यास सदैव मी तुमचा सोबत असल्याचे आश्वासन दिले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रोजेक्ट मॅनेजर संगीता बाविस्कर यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले व कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानले.