जळगाव (प्रतिनिधी) शिवसेना सचिव सुरज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिक विराज कावडीया यांच्या पुढाकाराने शहरातील ३२ अनाथमुलांना शैक्षणिक व जीवनावयशक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
पेन, पेन्सिल, वही, सोयाबिन तेल, साखर, चहा पट्टी, मिरची, हळद, तांदूळ, मूंग डाळ, तूर डाळ, गहूचे पीठ, मिठ, बिस्कीट, बेसन, रवा, मैदा, शेंगदाणा, इत्यादी देण्यात आले. यावेळी शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहानगरप्रमुख प्रशांत सुरळकर, शिवसैनिक विराज कावडीया, उमाकांत जाधव, पियुष तिवारी, प्रीतम शिंदे, संदीप सूर्यवंशी, अमित जगताप, पियुष हसवाल, अर्जुन भारुळे आदी उपस्थित होते.