गारखेडा ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत मका पीक प्रात्यक्षिक मका बियाणे तालुका कृषी अधिकारी किरण देसले यांच्या मार्गदर्शनाखाली आज शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.
कृषी सेवक विमल सुरावर यांच्या सहकार्याने गावातील शेतकऱ्यांना मका बियाणे वाटप करण्यात आले आहे. त्याप्रसंगी पत्रकार सतीश बोरसे गारखेड़ा येथील शेतकरी आनंद गोंधड़े, जगन महाजन, कैलास पाटील, योगराज पाटील, बलीराल पाटील व गावातील इतर शेतकरी उपस्थित होते. सदर मका बियाने वाटप हा कार्यक्रम तालुका कृषि ऑफिस धरणगाव येथे घेण्यात आला.