धरणगाव (प्रतिनिधी) राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव,बुलढाण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबाद प्रमाणे यावर्षीही गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वह्या वाटपचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
शहरातील पी.आर. हायस्कूल आणि अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना धरणगाव शिवसेनेच्या वतीने वह्या वाटप करण्यात आल्या. प्रत्येक शाळेला १५०० वह्या याप्रमाणे आज दोन शाळांमध्ये ३ हजार वह्यांचे वाटप करण्यात आले.
माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष स्व.सलीमभाई पटेल आणि माजी शहर प्रमुख स्व. राजेंद्र महाजन यांच्या स्मरणार्थ नगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते पप्पू भावे यांच्याकडून दोघां शाळांमधील प्रत्येकी शंभर विद्यार्थ्यांना बूट देण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेच्या कार्याविषयी बोलताना पी.आर. हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण याची आठवण करून दिली.
अॅग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक यांनीही शिवसेनेच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शालेय साहित्य, वह्या, बूट, मिळाल्याचा आनंद गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.